Arrow Left
profile

Thoughts become Things!

Don't Worry पण ते दिसू द्या की चेहऱ्या वरी - part 2


।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

नवीन पत्रात आपलं मनापासून स्वागत आहे. मागच्याच भागात मी सांगितलं की कसं Without worring काही जणं कामं पटापट संपवतात. आज त्याचा पुढचा भाग मी सांगतो आहे. तुमचा मागचा भाग वाचायचा राहीला असेल तर या लिंक वर जाऊन तुम्ही तो वाचू शकतात.

Don't Worry पण ते दिसू द्या की चेहऱ्या वरी! (ck.page)

मी क्लास मधे माझ्या वयाचं कोणी मोठं आहे का ते बघायला गेलो पण मला कोणी दिसलं नाही. एक जरा मोठा मुलगा मला दिसला तो थोडा माझ्या वयाच्या जवळपासचं असावा असं मला वाटलं म्हणून मी त्याला भेटायला जवळ गेलो तर तोच माझ्या कडे चालत आला आणि जसा तो जवळ आला अजून एक लहान मुलगा पळत पळत आला आणि त्याला म्हणे, "सर...सर....मी किक्सची प्रॅक्टिस करू?"

माझ्या डोक्यात विचार आला एक माझ्या वयाचा मुलगा दिसला आणि तो सुद्धा क्लास मधला सर निघाला. असो बोलून तर बघू. म्हणून आमची चर्चा झाली. मग चर्चे मधे फिटनेस किती महत्वाचा, लोकं आजकाल कसे चांगलं नसलेलं अन्न खाऊन जाड होतं आहेत, लहान मुलं कशी टीव्ही मोबाईल च्या मागे लागलेली आहेत असे बरेच विषय बोलून झाले. मी शेवटी विचार करून करून प्रश्न विचारला.

"सर, इथे कोणी मोठं येतं का प्रॅक्टिस करायला? मोठं म्हणजे माझ्या वयाचं? का हा क्लास फक्त लहान मुलांसाठी आहे?"

सर हसून म्हणाले, "व्यायाम हा सगळ्यांसाठी असतो. सध्या तर कोणी मोठं नाही. तुम्ही कोणा साठी चौकशी करतं आहात?"

आता ह्या प्रश्नामुळे पुन्हा चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली. मी पटकन म्हणालो, "माझे भाच्चा आणि भाच्ची येणार आहेत. ते पुण्याला असतात. मला त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवायचं आहे. ते आता महिनाभर आहेत इथे. एक महिना तरी आणतो त्यांना."

सर, "एका महिन्यात काही होणार नाही. पण ठीक आहे आवड निर्माण झाली तर चांगलंच आहे. घेऊन या. माझा नंबर घ्या काही लागलं तर कॉल करा. चला मी प्रॅक्टिस ला जातो." असे म्हणून ते पळाले.

तिथून घरी येताना माझ्या डोक्यात इतक्या गोष्टी फिरत होत्या. गोष्ट छोटीशीच होती पण माझं मन काही तरी वेगळंच मला सांगत होतं.

साधा विचार आहे. तुम्ही पण करा आणि मला सांगा. एखादी गोष्ट तुम्हाला लहानपणी पासून आवडते पण काही कारणाने ती अनुभवायला तुम्हाला मिळाली नाही आणि तुम्ही थोडे मोठे झाल्यावर मिळाली तर तुम्ही काय करणार?

माझ्या डोक्यात आलेले विचार तुम्हाला सांगतो.

पहिला विचार कोणी विचारलं तू व्यायाम करतो का तर काय सांगायचं? मी कराटे च्या क्लास ला जातो? हे सांगितलं तर किती हसतील मला सगळे?

दुसरा विचार सगळे जणं जिम मधले कमाल फोटो टाकतात मी काय करणार? लहान मुलांसोबत उद्या मारतानाचा व्हिडिओ दाखवू?

तिसरा विचार हे सगळे लहान आहे. आज नाही तर उद्या प्रॅक्टिस करून ह्यांना सगळं जमेल. किक्स असतील, पंच मारणं असेल, माझं काय? मी ह्यांच्या इतका हात पाय वाकवून व्यायाम करणारा राहिलो नाहीये.

हे मी २-३ विचार सांगतो आहे असे खूप सारे विचार डोक्यात येऊन गेले. घरी माझी बायको मला हसली ते वेगळंच. "काही पण करायचं असतं तूला. जिम ला इतके सुट्ट्या मारतो तू. कुठे वू शू आता. जिम कर आणि बस्स शांत." हा टोमणा मला मिळाला.

त्या दिवशी मला रात्री झोप आली नाही. मी रात्री मी जे लहानपणी बघायचो ते ब्रूस ली आणि जॅकी चॅन चे सगळे मूवी सीन परत पाहिले आणि स्वतःला एक च प्रश्न विचारला. उद्या पासून मी तिथे जाऊन किती व्यायाम करू शकेल किती किक्स आणि पंच मारू शकेल ते बघू पण मला तिथून व्यायाम करून शिकून बाहेर पडल्यावर आनंद मिळेल का?

माझ्या डोक्यात मोठ्ठ YESSSSSSSSSSSS असं उत्तर आलं आणि मग काय सांगायचं.

दुसऱ्या दिवशीपासून मी वू शू शिकणारा एक विद्यार्थी झालो. मी आजही एक विद्यार्थी म्हणून जसा असलो पाहिजे तसाच आहे हे मला तिथे प्रॅक्टिस करता करता जाणवलं आणि माझा आनंद अजून वाढला. काही दिवस झाले क्लास करून. मी विचार केला होता तितका वाईट मी सगळं विसरलेलो नाहीये. मला किक्स पंच चांगले जमत आहेत. स्टॅमिना पण जितका कमी वाटलं होता तितका माझा नाहीये.

आज मी काही दिवसातच तिथल्या सगळ्या छोट्या मुलांचा दादा म्हणून ओळखलो जातो. त्यांना उंच किक्स ची प्रॅक्टिस करायची असेल की बरोबर माझी आठवण येते. आणि अश्या भरपूर गमती जमती आहेत त्या मी कधी तरी परत सांगेल.

मुद्दा इतकाच की आनंदी रहावं आणि चिंता करू नये.

चिंता केल्या मुळेच आपण आनंदापासून दूर होतो.

एका मनाच्या श्लोकात समर्थ रामदास खूप छान सांगतात.

मनी मानव व्यर्थ चिंता वहाते । अकस्मात होणारे होऊन जाते ।

त्यांनी किती छान शब्द वापरला आहे बघा ना. चिंतेला ते व्यर्थ म्हणतात. जी खरोखर आहे. जसं मी मागच्या पत्रात मी श्रीकृष्णांनी सांगितलेलं लिहिलं होतं (मा शुचः) Don't Worry.

तर आज पासून आपण पण आयुष्यातल्या काही गोष्टींबद्दल Don't worry राहूया आणि तेच आपल्या चेहऱ्या वरी दिसू देऊया.

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page