profile

Thoughts become Things!

वेब सिरीज बोहोत देख ली आज देखते हे नाटक!


। । श्री । ।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

स्वागत आहे आपले आमच्या नवीन पत्रात आणि आजचं पत्र नेहमीप्रमाणे खास आहे. कारण आज चर्चा होणार आहे एका नाटकाबद्दल. आणि माझ्या मागच्या काही पत्रांचे तुमचे रिप्लाय फारच कमाल आहेत. GIF आवडणारी मंडळी जास्तचं आहेत.

काही जणं तर असं म्हणाले की वाचण्याचा इंटरेस्ट जास्त येतो जेंव्हा तू विषयाला धरून GIFs वापरतो. काही जण तर म्हणाले तू लिहितो पण का? आम्ही तर फक्त ते GIF आणि त्याच्या खाली लिहिलेलं वाचून सोडून देतो. हा.हा.हा... माझ्या पूर्ण पत्रातली (Newsletter) मधली एक लाईन जरी तुम्हाला आवडली तरी मी खुश आहे. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असेच वाचत रहा आणि मला प्रतिक्रिया देत रहा.

आमचे पत्र वाचता वाचता GIF दिसले कीवाचणाऱ्याचा चेहरा असा होतो.

आजचा विषय आहे "नाटक"

आज काल नाटक बघणारे लोकं आहेत तरी का असा प्रश्न पडला असेल तर सांगतो, भरपूर आहेत. त्यावर चर्चा फारशी होतं नाही म्हणून नाटक कोणी बघत नाही, नाटक चालत नाहीत, नाटक बोरं असतात, VFX च्या काळात कोण बघेन नाटक, असं काही तुम्हाला वाटतं असेल तर चूक करतं आहात.

थिएटर मधे चित्रपट आपल्याला पाहिजे त्या वेळात म्हणजेच convinance नुसार बघता येतो, वेब सिरीज, नेटफ्लिक्स, यु ट्यूब तर घरी आडव्या पडूनच बघतो आपण, ते पण आपल्या convinanace नुसार आणि त्या बघितलेल्या सिरीज, चित्रपट ह्यांचं क्रिटिक होणं पण किती सोप्प ना? उघडायचं इंस्टाग्राम बोलायचं पाहिजेल ते. व्हाट्सएप्प स्टेटस वर लिहून टाकायचं हा असा, तो तसा, ह्याला ऍक्टिंग येतं नाही, हा चित्रपट चांगला, हा वाईट किती सोप्प ना?

पण नाटक हा विषय अवघडंच. कधीतरी शनिवार किंवा रविवार एक शो लागणार. तो पण रात्री ९ -९.३० चा म्हणजे संपायला वाजणार रात्रीचे १२. बाप रे इतका लेट? नको नको. कोण इतका त्रास सहन करेन ते पण मनोरंजना (Entertainment) साठी?

आपण घरी पडू जे आपल्या ला अल्गोरिथम दाखवतं आहे ते बघू आणि त्या स्क्रीन कडे बघत बघत, अगदी डोळे आपोआप बंद होई पर्यंत बघण्याचा पर्यंत करू आणि झोपून जाऊ. सकाळी उठलं की सांगायला मोकळे मी आज हे बिंज वॉच केलं, मी ती सिरीज एका रात्रीत संपवली वगैरे.

पण खरोखर मला सांगा. जे आपल्या convinance प्रमाणे मिळतं ते चांगलंच असतं का? "जिथे थोडे कष्ट लागतील ते चांगलं नसतं", हे का न बघता ठरवावं? मी स्वतःला एक उत्कृष्ट ऑडियन्स म्हणतो. का माहिती? कारण मी लहान पणीपासून चित्रपट, नाटक हे नुसते बघत नाही तर त्या मधून काही ना काही शिकत पण आलो आहे.

म्हणून मला चित्रपट, नाटक, वेब सिरीज (चांगल्या वेब सिरीज) ह्या बघायला मनापासून आवडतात. हळू हळू हे सगळं इतकं आवडत गेलं की मी जे काही चित्रपट, नाटक आवडतात ना त्या वर एक मस्त माझा ब्लॉग लिहीत गेलो.

या आठवड्यात मी एक मस्त नाटक पाहिलं!

तर या आठवड्यात मला संधी मिळाली एक नाटक बघण्याची ज्याचं नाव आहे "चाणक्य". तुम्ही बघितलं नसेल तर वेळ काढून बघितलं पाहिजे असं हे नाटक आहे. आता हे नाटक कॉमेडी नाही. हे नाटक जे नाव आहे त्याच व्यक्ती बद्दल आहे. चाणक्य.

चाणक्य ह्यांनाच आपण अजून काही वेगवेगळ्या नावांनी ओळखतो जसं की कौटिल्य किंवा विष्णुगुप्त. चाणक्य हे राजनीती, अर्थशास्त्र, चिकित्सा, युद्धांची रणनीती आणि ज्योतिशास्त्र अश्या काही विषांमधे विद्वान होते. ह्याचं विद्वत्ते मुळे ते चंद्रगुप्त मौर्य ह्यांचे महामंत्री होते. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक आणि सम्राट होते.

आणि अजून अवघड अवघड काहीतरी इतिहासाच्या पुस्तकासारखे शब्द मराठी मधे लिहून मला हे पत्र एक इतिहासाचा एखादा धडा आहे असं बनवायचं नाहीये. सोप्प सांगतो. Chandragupta Maurya was a King and Chanakya was a King maker.

असे दिसायचे आचार्य चाणक्य

आज प्रत्येक क्रिकेट टीम ला कोच असतो किंवा कुठल्याही स्पोर्ट्स खेळणाऱ्या व्यक्तीच्या सोबत एक कोच असतो. का असतो विचार करा ना! तो कोच म्हातारा असतो. कधीतरी १० -१२ वर्षांपूर्वी खेळलेला असतो तो काय शिकवणार ह्या तरुण, पूर्ण एनर्जी भरलेल्या स्पोर्ट्स मॅन ला? असं कधी वाटलं असेल तुम्हाला. पण एनर्जी चुकीच्या दिशेला लावून काहीही मिळतं नाही. त्या शक्ती ला दिशा देणारा जो पर्यंत एक कोच मिळतं नाही सगळं व्यर्थ आहे.

तर हे जे चाणक्य होते ह्यांनी नेमकं काय शिकवलं हे शिकण्यासाठी हे नाटक बघायला पाहिजे. राजा बनणे ही काय सोपी गोष्ट आहे का? त्या साठी खूप काही शिकावं लागतं खूप काही सोडावं लागतं. खूप काही शिकावं लागतं मी जे म्हणालो ना, कदाचित प्रत्येक राजा बनू बघणारा व्यक्ती हे शिकून घेईल पण "खूप काही सोडावं लागतं" हा खरा अवघड भाग आहे.

आता माझी चाणक्यांच्या विचारांसोबत ओळख कशी झाली सांगतो. बऱ्याच वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचण्यासाठी डिव्हाईस मिळायचं जे अजूनही मिळतं ज्याचं नाव आहे ऍमेझॉन किंडल. ऍमेझॉन म्हणजे तीच कंपनी ज्यावरून आपण काही ना काही मागवत रहातो. मला पुस्तकं वाचायची खरी सवय किंडल पासून लागली. मी एक दिवस ऍड पहिली किंडल ची आणि ठरवलं की मला हे विकत घायचं आहे. त्या प्रमाणे काम करून मी पैसे कमवले आणि किंडल विकत घेतलं. अनलिमिटेड पुस्तकं वाचायचे असतील तर महिन्याला काहीतरी रु १४९ चं रिचार्ज असतं ते मी केलं आणि पाहिलं पुस्तकं माझ्या डोळ्यासमोर आलं ते होतं कॉर्पोरेट चाणक्य. हे पुस्तक लिहिलं आहे राधाकृष्णन पिल्लई ह्यांनी.

ह्या नाटकाला जाण्याच्या आधी तुम्ही विचार कराल राजा, युद्ध नीती, राज्य जिंकणं हे सगळं जर दाखवायचं असेल तर नाटकात कसं काय दाखवणार? यासाठी तर VFXचं पाहिजे ना. पण एकदा चाणक्य नाटक बघाच. कारण ह्या नाटकात काय काय आहे माहिती का?

कॅमेराच्या मागे सुपरमॅन असा उडतो

फाईट

काही युद्धाचे सीन्स अगदी असे बघायला मिळतात या नाटकात

स्टेज वर तुम्ही तलवार, लाठी युद्ध, कुस्ती असे बरेच फाईट सीन बघू शकाल. जे खूप छान choreograph केलेले आहेत. मला बघताना कुठेही असं वाटलं नाही की हे खोटं खोटं लढत आहेत.

संगीत

संगीत जर नाही तर नाटक काय आणि चित्रपट काय! कशालाच मज्जा येतं नाही. पण चाणक्य नाटकात घोड्यांच्या टापांचा आवाज या पासून प्रत्येक संगीत हे इतकंच छान बसवलं आहे की पुन्हा मी तेच म्हणेल, "मला मी नाटक बघतो आहे हा विसर पडला होता."

डायलॉग्स

त्या काळातलं हिंदी किंवा मराठी हे आजच्या सारखं नव्हतं. म्हणजे मी जसा लिहितो आहे तसं तर नक्कीच सगळे बोलत नव्हते. पण त्या काळातली वाटावी अशी मराठी आणि त्या मधे चाणक्य ह्यांचा भूमिकेत शैलेश दातार किंवा चंद्रगुप्त मौर्य ह्यांच्या भूमिकेत चैतन्य सरदेशपांडे किंवा राक्षसाचार्य ह्यांच्या भूमिकेत ज्ञानेश वाडेकर ह्या तिघांचेही डायलॉग्ज कमाल आहेत.

आणि इथे खरी मजा आहे नाटक बघण्याची. कारण मी चैतन्य सरदेशपांडे, शैलेश दातार आणि ज्ञानेश वाडेकर ह्यांच पाठांतर बघून थक्क झालो. पाठांतर हा एक गुण अश्या अक्टर्स कडून घेण्यासारखा आहे. हा माझा व्हियू आहे सगळेच कदाचित मान्य करणारं नाहीत. पण जे वाटलं ते सांगितलं.

स्टोरी

ही कथा आपल्या प्रत्येकाला खुर्चीत पकडून ठेवती "नेमकं पुढे काय होईल" यासाठी. एक प्रसंग संपल्यावर जेंव्हा ब्लॅक आऊट होतो ना तर तितक्या वेळात मला पुढे नेमकं काय होईल ह्याची घाई होतं होती. ऑनलाईन बघण्याच्या सवयीप्रमाणे मी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न केला पण आपण नाटकात आहोत वेब सिरीज मधे नाही हे विसरण्याइतका मी स्टोरी मधे अडकलो होतो.

मी चाणक्य ह्यांचा बद्दल अभ्यास करावा का?

ज्याला आयुष्यात एकट्याला नाही तर खूप साऱ्या लोकांना सोबत घेऊन काही तरी मोठ्ठ करण्याची इच्छा असेल तर त्याने चाणक्य ह्या व्यक्तीचा आणि त्याने लिहून ठेवलेल्या किंवा त्यांच्या वर लिहिल्या गेलेल्या पुस्तकं, नाटक, चित्रपट सगळ्यांचा अभ्यास केला पाहिजे.

राधाकृष्णन पिल्लई ह्यांनी चाणक्य ह्या विषयावर तर PHD केलेली आहे. त्यांचे कमीत कमी १५ पुस्तकं आहेत चाणक्य आणि त्यांची शिकवण ह्या विषयाला धरून. सगळे बेस्ट सेलिंग पुस्तकं आहेत. वाचण्यासारखे आहेत.

Corporate Chanakya पुस्तक वाचल्यावर मला समजलं की चाणक्य हे काही साधे सुधे व्यक्ती नव्हते. राज्य उभं करण्यापासून ते कसं चालवावं आणि त्यात अडचणी आल्यात तर कुठल्या वेळेला काय करावं ह्याचं कमालीचं ज्ञान ते घेऊन होते.

त्यांच्या पुस्तकामधे अगदी पहिल्या २-३ पानांत मला समजलं मी कुठे चुकतं होतो ते.

If the king is energetic, his subjects will be equally energetic. If he is slack (and lazy in performing his duties) the subjects will also be lazy, thereby, eating into his wealth. Besides, a lazy king will easily fall into the hands of the enemies. Hence the king should himself always be energetic.

मी कुठल्या कंपनीचा मालक असेल किंवा मी कुठल्या टीमला लीड करत असेल किंवा कुठल्याही कामात, मी स्वतः उत्साही आणि energetic असलो पाहिजे. जर मी तसं नाही वागलो तर बिझनेस, माझं काम हे आरामात कोणीतरी दुसरा घेऊन जाईल.

बस्स त्या दिवशी मी ठरवलं की माझ्या आयुष्यात काहीही चाललेलं असेल समोरच्याला माझ्या सोबत बोलताना, माझा चेहरा किंवा बोलणं बघून ते समजलंच नाही पाहिजे. अजून कोणाकडून जर समजलं तर ती गोष्ट वेगळी आहे. पण माझ्या कडे बघून एकच भावना प्रत्येकाला यावी ती म्हणजे "He is super energetic and always smiling." मी करण्यात यशश्वी झालो आणि त्याचे रिझल्ट मला नेहिमी दिसतात.

असे १ नाही १०० पेक्षा जास्त गोष्टी त्यांनी सांगून ठेवल्या आहेत ज्या वाचून आपण रोजच्या जीवनात आणल्या तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की किती विचार करून चाणक्यांनी सगळं लिहून ठेवलं आहे ते.

चाणक्य आणि त्यांचा काळ हा कमीत कमीत २००० वर्ष जुना काळ आहे. पण कमाल बघा ना त्यांचे विचार आजही किती योग्य वाटतात. चाणक्यांनी त्या काळात एक राष्ट्र ही संकल्पना मांडली होती. भारत हे संपूर्ण एकमेव राष्ट्र असावं, ह्या मधे कुठल्याही जातींचे बंधन किंवा विभागणी नसावी हाच विचार चाणक्यांनी करून त्या वर कामही केलं होतं.

तुम्ही कोण आहात well Trained का well Educated?

एक शिक्षकच क्रांती घडवू शकतो.

त्यांचा शिक्षणावरचा एक विचार वाचून तर मी थक्क झालो.

Education is the best friend. An educated person is respected everywhere. Education beats the beauty and youth. - Chanakya Niti.

आजही कित्तेक लोकांना शिक्षणाचं ,महत्व कळत नाही ते चाणक्य ह्यांनी २००० वर्षांपूर्वी ओळखलं होतं.

मी सुरवातीला म्हणालो ना, आपण क्रिटिक बनतो वेगवेगळ्या वेब सिरीज, चित्रपट किंवा नाटक बघून. एक वेळ क्रिटिक तरी परवडले अजून एक सवय खूप खास प्रत्येकात भरलेली असते ती म्हणजे निंदा करण्याची. चाणक्य त्या बद्दल काय सांगत आहेत बघा.

निंदक के विषय में चाणक्य कहते हैं कि यद्यपि पक्षियों में कौआ, पशुओं में कुत्ता तथा साधुओं में पाप में निर्लिप्त व्यक्ति सबसे अधिक दुष्ट और अधर्मी होता है लेकिन निंदक इनसे भी अधिक पापी और चांडाल प्रवृत्ति का होता है। यद्यपि निंदा करने से कुछ प्राप्त नहीं होता, किंतु निंदक सदैव निंदा-रस का पान करता है। निंदा करने के कारण उसके पापों में निरंतर वृद्धि होती”
― Chanakya, Chanakya Neeti

चाणक्य ह्यांच्या म्हणण्यानुसार निंदा करणं तर पाप आहेच. पण निंदा केल्याने असलेल्या पापांमधे वृद्धीही होते, म्हणेजच ते वाढत जातात. तर ही सतत कोणाची तरी निंदा करायची सवय सोडली पाहिजे भारतीयांनी असं मला मनापासून वाटतं.

तर हे नाटक तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. कदाचित तुमच्या आयुष्यातला चाणक्य ह्या विषयाचा अभ्यास ह्या नाटकापासून सुरु होऊ शकतो.

चाणक्य मराठी नाटका बद्दलची अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे इंस्टाग्राम अकाऊंट फॉलो करा .

Chanakya Marathi Play Instagram

Chanakya Marathi Play Facebook/Meta


माझाव्यापार ही एक कंपनी सुद्धा आहे जी तुम्हाला well Educated बनवते!

ब्लॉग्स आजही लोकं वाचतात आणि लिहिणारे पण खूप आहेत. वाचणारे खूप असतीलही पण "दिसामाजी काही ते ल्याहावें, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" ह्या समर्थ रामदासांच्या एका वाक्याला धरून मी प्रत्येकाला लिहिण्याचे महत्व सांगत असतो.लिहिण्याने आपण स्वतःला ओळखायला लागतो.

जर तुम्हाला सुद्धा स्वतःचा ब्लॉग लिहिणं सुरु करायचं असेल तर माझाव्यापार चा हा फ्री कोर्स नक्की बघा. अश्या इंटरनेट वर फ्री मधे उपलबद्ध असलेल्या स्वतःला ला शिकवणाऱ्या गोष्टींची माहिती पाहिजे असेल तर आमचं पत्र (Newsletter) नक्की subscribe करा.

Learn Google Blogger "Blogging Tool"

Subscribe to MazaVyapar's Newsletter

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page