Arrow Left
profile

Thoughts become Things!

Algorythm च्या जाळ्यात तुम्ही अडकले आहात का?


। । श्री । ।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

मी हा लेख वाचणाऱ्या व्यक्तीचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे आणि त्याला माझ्या कडून एक Thank You पण देतो आहे. का? काय आहे ना....जवळपास सगळे फोन वर शॉर्ट कन्टेन्ट म्हणजेच रिल्स किंवा स्टोरी बघण्यात गुंग झाले आहेत. ते सगळे हे विसरले आहेत की आपण जे काही शिकलो आहोत ते वाचनातूनच शिकलो आहोत. पण तुम्ही आवड म्हणा किंवा माझ्या सोबत ओळख म्हणा त्यामुळे हा लेख वाचण्याचा निर्णय घेतला. त्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

माझ्या मते वाचत रहावं. काहीही वाचा चालेल पण वाचा. कारण वाचन करण्यासाठी फोकस चांगला असावा लागतो. व्हिडिओ बघायला त्याची गरज नाही. फोकस जरी नसला तरी कान, डोळे ह्यांना आवडणाऱ्या गोष्टी अश्या छान दाखवतात की लक्ष कुठे जातंच नाही. ती पण एक स्किल आहे. चांगलीच आहे पण अतिरेक व्हयला लागला की गडबड सुरु होते. तर इतक्या वेगवेगळ्या रिल्सचा मारा चालू असताना वेळ काढून तुम्ही माझा लेख वाचत आहात तर तुम्हाला Thank You म्हणणे ही मी एक खूप छोटी गोष्ट करतो आहे.

आता आजच्या विषयाबद्दल बोलूया. तुम्ही हेडिंग वाचलंच असेल. Algorythm च्या जाळ्यात तुम्ही अडकले आहात का असा मी एक साधा प्रश्न विचारला आहे.

मी माझा एक अनुभव सांगतो. मी जेंव्हा पहिल्यांदा फोन पहिला तेंव्हा मी सातवी किंवा आठवीत होतो. अगदी साधा फोन ज्या मधे फक्त कॉल आणि मेसेज ची सोय असायची. मी दहावीच्या पुढे जसा जसा जात होतो मी स्वतः टेकनॉलॉजि कशी मोठी मोठी आणि कल्पनेच्या पलीकडे जात आहे हे अनुभव घेत होतो. मोबाईल मधे कॅमेरा, मोबाईल मधे टीव्ही, मोबाईल मधे गेम्स. एक वेळ असा होता माझ्या आयुष्यात जेंव्हा मला वाटलं होतं मी सगळ्यात चांगला फोन घेईल आणि बस्स माझं सगळं काम किती सोप्प होईल.

वेगळा कॅमेरा सोबत ठेवायची गरज नाही.

वेगळा लॅपटॉप सोबत नको.

गाणे ऐकायला वेगळा MP3 प्लेयर नको.

काही लिहावं वाटलं तर डायरी किंवा पेन नको. मोबाईल मधे नोट्स आहेत ना. तिथे लिहायचं.

कोणासोबत बोलावं वाटलं तर फोन मेसेज आहेच.

काय मस्त लाईफ असेल ना? ह्या कल्पना मला खूप छान वाटायच्या.

पण आता काय वाटतं सांगू? मी मोबाईल वापरत वापरत, बघत बघत आता १५ वर्ष नक्कीच झाले आहेत. मला आज वाटतं की मोबाईलने मला कोणीतरी व्यक्ती माझी आठवण काढते आहे आणि त्या बद्दल बोलायला, सांगायला मेसेज, कॉल केला आहे हे सांगावं. तुम्ही म्हणाल हेच तर मोबाईल सांगतो. नक्की? पुन्हा विचार करा! आपण दिवसातून समजा २०० वेळेस मोबाईलची स्क्रिन उघडतो तेंव्हा कितीदा कोणीतरी आठवण केली म्हणून उघडतो आणि किती वेळेस कुठलं तरी मोबाईल ऍप आठवण करत आहे म्हणून उघडतो?

एकदा विचार करा. जास्तीस्त जास्त वेळा फोन हा काहीतरी नोटिफिकेशन आलं म्हणून आपण उघडतो. हे नोटिफिकेशन कोणीतरी आठवण काढली तरच येतात असं काही नाही. कोणीतरी फोटो बदलला म्हणून सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकतं. आमच्या कडे ऑफर चालू आहे म्हणून सुद्धा नोटिफिकेशन येऊ शकतं.


हे मी का सांगतो आहे कारण एप्स जर तुम्ही आठवण काढणार तर ते तुमच्या कडून बिनझेस करण्याच्या हेतूनेच आठवण काढणार. ह्या मागे त्यांचा अजून कुठलाही हेतू नाही. तुम्ही जास्तीत जास्त वेळ त्यांनी बनवलेल्या एप्स वर घालवावा जेणे करून ते दुसऱ्यांना सांगू शकतील की बघा इतके लोकं माझं एप्प दिवसातून इतके इतक्या वेळेस वापरतात. तुमची ऍड देतो भरपूर ग्राहक मिळतील त्या बदल्यात मला इतके इतके पैसे द्या. हा एकमेव हेतू घेऊन ते कंपनी चालवत आहेत. तसे ते सांगत नसतील सगळ्यांसमोर पण जे खरं आहे ते कोणीतरी सांगायला हवं का नाही?

आजच्या ब्लॉग मधून मला इतकंच समजावून सांगायचं आहे की मोबाईल अप्प्स हे तुमचा वापर करत आहेत का तुम्ही त्यांचे एक वापर करून घेण्याचे साधन बनले आहात हे जरा लक्षात घ्या. उदाहरण सांगतो. आजकाल व्हाट्सअप स्टेटस मुळे इतकं सोप्प झालं आहे! प्रत्येकाला मेसेज पाठवायची गरजही नाही. म्हणजे आधी बघा पत्र लिहून द्यावं लागायचं. नंतर मेसेज आले. ई-मेल म्हणा. हे आपल्याला लिहून पाठवावे लागत होते. आता लिहा स्टेटस वर ठेवा सगळे जण वाचतील. तुम्ही हे बोलताना ऐकलं असेल, "मी व्हाट्सअप फक्त लोकांबद्दल, माझ्या जवळच्यांबद्दल मी अपडेटेड रहावं म्हणून बघत असतो. बाकी काही नाही." बरं ते बघून मनात काय काय येतं ही काही लिहिण्यासारखी गोष्ट नाही. ते बाजूला राहू देऊ. सध्या इतकाच विचार करू की रोज १०० जणांचे अपडेट घेऊन तुम्ही काय करणार आहात? त्या शंभर जणांपैकी १० जणांना पैश्याची, शिक्षणाची, मदतीची, सोबतीची गरज पडली तर तुम्ही वेळ काढून भेटणार आहात त्या १० जणांना? का वेळ नाही म्हणून जे स्टेटस वर पाहिलं किंवा वाचलं त्या बद्दल चांगली किंवा वाईट रिअक्शन देऊन विसरून पुढचे स्टेटस पाहण्यात गुंग होणार?

मी सांगतो जास्त आकडा हा बघून स्क्रोल करणाऱ्यांचा आहे. हेच तर सगळ्या मोठ्या कंपन्यांचं काम आहे. तुम्ही वेळ नुसता चांगलं वाईट बघण्यात, एक दुसऱ्यांना ते पाठवण्यात आणि त्या वर चर्चा करण्यात घालवावा पण काही कृतीत आणू नये.

पुन्हा एकदा मी सांगितले खरं वाटतं नसेल तर माझे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर तर आज नक्की मला द्या.

जर यू ट्यूब वर सगळे फिटनेस चे व्हिडिओ फ्री मधे उपलब्ध आहेत पण जेंव्हा पासून यू ट्यूब बघण्याची भारताला सवय लागली लोक फिट झाले का आळशी झाले?

हेच गणित आपण जे अन्न खातो त्या बद्दल लावा. कुठले अन्न आपल्या साठी चांगले, कधी खावे, कधी खाऊ नये ही सगळी माहिती इंटरनेट वर फ्री मधे उपलब्ध आहेत. पण आज लोकं अन्न समजून खाणारे तुम्हाला जास्त माहिती का जे मनाला येईल , जेंव्हा वाटेल तेंव्हा खाणारे जास्त माहिती?

बिझनेस कसा करावा हे शिकवणारे लोकं खूप आहेत. जे फ्री मधे शिकवत आहेत पण तरी सुद्धा नौकरी साठी १० जागा असताना का तिथे १०,००० जण येतात नौकरी मिळवायला?

विचार करा ह्या प्रश्नांचा.

मी सांगू? यू ट्यूब चं काम हे तुमच्या आवडीचे व्हिडिओ दाखवणे आणि तुम्हाला त्यात जास्तीत जास्त वेळ अडकवून ठेवणे हे आहे. शिकवणे, समजावणे वगरे सगळं आहे पण ९९% हे बघणाऱ्याला जास्तीत जास्त वेळ कसा आपण व्हिडिओ बघण्यात गुंतवावं ह्याचा विचार करून हे एप्स बनवले आहेत.

कारण हे सगळं काम algorythm करतो. एखाद्याला आपला खास मित्र बनवायचं असेल तर आपल्या आवडीचं नाही त्याच्या आवडीचं बोलावं हे आपण जितके फास्ट शिकलो नाही तितके फास्ट हे algorythmने शिकून घेतले आहे. म्हणून बघा मी माझ्या वडिलांच्या फोन मधे बघतो तर मला न्यूज चा संबंधी सगळं काही दिसतं, माझ्या बायकोचा फोन पाहिला तर आर्टस् आणि क्राफ्ट्स रिलेटेड दिसतं, आईचा फोन पहिला तर रामायण, महाभारत, दासबोध ह्या संबंधातले व्हिडिओ दिसतात.

आता मला सांगा बाबांसोबत मी आर्टस् आणि क्राफ्ट्स बद्दल बोललो तर ते किती वेळ गप्पा मारणार? पण न्यूज चा विषय निघू द्या. गप्पा अश्या रंगतात. हे तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल काही लोकांबद्दल.

सांगायचा मुद्दा हा आहे की प्रयत्न पूर्वक algorythm चा बाहेर थांबा. खूप जास्त विचार करून आपण एका ठराविक विचारांपर्यंत अडकून रहावे हीच प्लँनिंग केलेली आहे आणि आपण त्यात अडकलेलो आहोत ह्याची जाणीव होणारही नाही.

तर मला सांगा तुम्ही कधी Algorythm च्या जाळ्यात अडकले आहात का आणि अडकले होते तर कसे बाहेर पडले? का अडकता अडकता ह्या ब्लॉग ने तुम्हाला वाचवलं? खरं सांगतो तुमचं मन हे खूप मोठ्ठा विचार करण्यासाठी बनलेलं आहे तोच करा. काहीतरी इंटरनेट वर बघून त्या मधे राहू नका.

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर


Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page