Arrow Left
profile

Thoughts become Things!

नेमका कुठला मार्ग स्वीकारावा?


। । श्री । ।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष ,

माझाव्यापारच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहे. माझं मागचं पत्र आत्ता पर्यंतच असं पत्र होतं ज्याला सगळ्यात जास्त रिप्लाय आले. छान वाटलं तुमचे रिप्लाय बघून. म्हणजे ज्यांनी रिप्लाय केले त्यांना म्हणतो आहे. काही जण तर मोठ्ठा आणि छान रिप्लाय करतात. ते वाचून अजून आनंद होतो. असं वाटतं व्हाट्सएप्प, ई-मेल ठीक आहे पण पत्रातली मजा वेगळी असते. हे सगळ्यांनी टेकनॉलॉजिच्या जगात विसरून जायला नको. टेकनॉलॉजिचा मदतीने पण चालेल पण काही जुन्या गोष्टी जिवंत ठेवण्याची गरज खूप आहे.

आजचा विषय हा तुम्हाला वेगळा वाटेल. का ते सांगतो! आपला जन्म हा ईश्वर प्राप्ती साठी झालेला आहे. तिथे पर्यंत पोहोचण्यासाठी चार प्रकारचे मार्ग दिलेले आहेत. ते नेमके कुठले आणि का आज मी हा विषय लिहायला घेतला.

का हाच विषय? मागच्या आठवड्यात ऐस ऐस राजमौली ह्यांची एक डॉक्युमेंट्री फिल्म मी पहिली. मॉडर्न मार्व्हल्स नावाने नेटफ्लिक्स वर आहे. राजमौली म्हणजे मोट्ठ्या बजेटचा चित्रपट. पहिला चित्रपट आणि पाहिलं तेलगू गाणं जे ऑस्करला जातं आणि गाण्याला ऑस्कर मिळतो पण. मी स्वतः त्यांच्या स्टोरी टेलींगचा खूप मोठा फॅन आहे. अश्या व्यक्तीची डॉक्युमेंट्री मी कशी काय न बघता सोडणारं? प्रत्येकाने बघावी. एक साधा व्यक्ती कसा १ ५ -२ ० वर्षात ऑस्कर पर्यंत पोहोचला. नुसता पोहोचला नाही तर स्टीवन स्पीलबर्ग ज्याला संपूर्ण जग फिल्म जगतामधला बादशाह म्हणतात तो राजमौलीनां म्हणतो की मी असं काम आयुष्यात कधी पाहिलं नाही. तर अश्या व्यक्तीचा अभ्यास केलाच पाहिजे. तुम्ही फिल्म बनवणारे आहात किंवा नाही पण यशश्वी व्यक्तीला तर समजून घेऊच शकतात.

हो..हेच आहेत RRR चे दिग्दर्शक.

ह्या डॉक्युमेंट्री त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही नास्तिक आहात असे आम्ही ऐकले आहे. तुमच्या घरचे जर इतके देवाला मानतात तर तुम्ही असे कसे? ह्यावर त्यांनी उत्तर दिलं की, "आपल्या धर्मात चार प्रकारे ईश्वरप्राप्ती होऊ शकते असं म्हणलं आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि राजयोग. ह्या पैकी मी कर्मयोगाला मानणारा व्यक्ती आहे, माझ्यासाठी माझं कामचं देव आहे."

खरं सांगा असा विचार मनात येतो का नाही की हा तर देवाचं काही करतं पण नाही ह्याला बरं मिळतं सगळं आणि देव मलाच जे मागितलं ते देत नाही. मी तर उपवास करतो, रोज पूजा करतो. मग माझ्या सोबतच असं का?

ह्याचं मला समजलेलं उत्तर मी लिहितो आहे. तुम्हाला जर चुकीचं वाटलं तर नक्की मला कळवा. मी पण आपल्या ग्रंथांचा, धर्माचा अभ्यास करत असतो आणि शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात मी पहिल्यांदाच अश्या विषयावर लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.

नका रे तुलना करू!

सगळ्यात आधी तुलना करणे (comperasion) मला हे मिळालं ह्याला का नाही मिळालं, ह्याला मिळू शकतं तर मला का नाही? ह्या विचारातच गाडी चुकीच्या दिशेने गेली आहे समजा. प्रश्न येणं किंवा एखादी गोष्ट मिळवावी, करावी वाटणं ह्याची गडबड नाहीये. पण दाखवतोच त्याला मी काय करू शकतो ते, तो करतो का मग मी पण करून दाखवतो, ह्यांनी घेतली का गाडी आता दाखवतोच माझ्या घरा समोर गाडी २ महिन्यात. हे कशाला पाहिजे?

जर प्रश्न मनापासून आहे की, काय करतो इतका मोठा फिल्म्स बनवणारा माणूस? तो देवाला मानत नाही आणि कामाला मानतो म्हणजे नेमकं काय करतो? ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. त्या डॉक्युमेंट्री मधे राजमौली आणि त्यांच्या सोबत काम केलेले सगळे अक्टर्स ते कसे कर्मयोगी आहेत तेच सांगतात. कसं ते शेवटी सांगतो.

आधी चार मार्ग नेमके कोणते आणि त्यात काय असतं हे समजून घेऊ.

मी आधी सांगितल्या प्रमाणे

१. कर्मयोग
२. ज्ञानयोग
३. भक्तियोग
४. राजयोग

प्रत्येक जण तितकेच मोठे कार्य करण्यासाठी बनलेला आहे. Each Soul is potentially divine. हे वाक्य स्वामी विवेकानंदांचे आहे. कोणी एक अमुक मार्ग स्वीकारतो म्हणजे मोठा हे आधी विसरून जा. सगळे मार्ग शेवटी ईश्वरप्राप्ती कडेच नेतात. पण विवेकानंद काय सांगतात. The goal is to manifest the Divinity. Do this, either by work or by worship or by philosophy or psychic control.

प्रत्येक आत्मा हा दैवी आहे पण गोल काय आहे की ते दैवत्व प्रकट करायची गरज आहे. तुम्ही ते प्रकट कसे करणार? काम करून, पूजा किंवा प्रार्थना करून, तत्वज्ञानातून किंवा मानसिक नियंत्रणातून कश्या ही प्रकारे करा. पण ते प्रकट करा.

आता अगदी २ ओळीत मला समजलेला, मी वाचलेला प्रत्येक मार्ग काय आहे हे सांगतो.

ज्ञानयोग - काहीजण चिंतनशील असतात. ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. बुद्धीला पटल्याशिवाय ते कशाचाही स्वीकार करत नाहीत. अशी माणसे ज्ञानयोगाच्या साधनेने ईश्वरापर्यंत पोहोचू शकतात.

राजयोग - काही माणसे एकांताप्रिय असतात. जनतासंपर्क, प्रापंचिक जीवन हे त्यांना आवडत नाहीत. अर्थार्जन त्यांना अनावश्य वाटते. अशी माणसे राजयोगाद्वारे मनाचे नियमन करून भगवंतापर्यंत पोहचू शकतात.

कर्मयोग - काही माणसे क्रियाशील असतात. एका जागी बस हे सांगणे त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध असते. अशावेळी त्यांना सत्कर्माला लावून कर्मयोगाद्वारे ईश्वरप्राप्ती करून घेता येते.

भक्तियोग - काही माणसे विलक्षण भावप्रवण असतात. त्यांना तर्कामध्ये अभिरुची नसते. त्यांचे अंतःकरण प्रेममय असते. अशी माणसे, प्रेमाद्वारे अथवा भावाद्वारे भगवंताची प्राप्ती करून घेतात.

पहिली लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की प्रामाणिकपणा हा भगवंतापर्यंत पोचण्यासाठी फार महत्वाचा आहे. मी आज कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचं उदाहरणं पाहिलं तो कर्मयोगी आहे हे मला समजलं म्हणून मी ठरवलं उद्या पासून पूजा बंद मी पण माझ्या कामाला देव मानणार. हा झाला मूर्ख पणा. किंवा इकडे पूजा करायची पण काही तरी करायचं म्हणून पटापट संपवून कामाला पळायचं. तुम्हीच सांगा हे प्रामाणिक पणाचं लक्षण आहे का? पूजा करणे हा एक भक्तियोगाचा भाग आहे. भक्तियोग म्हणजे प्रेमाद्वारे आपण भगवंतापर्यंत पोहचु शकतात. गडबडीत पूजा करून ऑफिसला पळायचं ह्यात प्रेम कमी आणि गडबड जास्त दिसते. पण असो सध्याच्या काळात आपण गडबडीत का होईना प्रेम आहे असं म्हणू.

जो मार्ग आहे तो प्रेमाने रोजच्या जीवनात जगला जात नाही आणि म्हणून प्रश्न येतात की माझ्याचं सोबत असं का होतं वगैरे वगैरे. सहसा गृहस्थाश्रमी किंवा प्रापंचिक साधकाने कर्ममार्ग किंवा भक्तिमार्गाचा अवलंब करावा. संन्याशी किंवा ब्रह्मचारी साधकाने ज्ञानमार्गाचा किंवा योगमार्गाचा अवलंब करावा असा संकेत आहे. पण ह्याचं काही गणित नाहीये की तू हाच मार्ग निवड आणि तुला हाच मिळेल.

आता मी सांगतो इतका मोठा फिल्म्स बनवणारा माणूस? तो देवाला मानत नाही आणि कामाला मानतो म्हणजे नेमकं काय करतो?

ज्याला ज्याला हे मार्ग समजले आणि जो जो ह्या पैकी कुठल्याही एका मार्गावर चालत असेल आणि त्याने अहंकाराचा त्याग केला नसेल तर तो त्याग करून मग रोजची उपासना करण्याची गरज आहे हे लक्षात घ्या.

उदाहरण सांगतो. तुम्ही रोज घरी पूजा करतात, सगळे उपास करतात पण जेंव्हा तुमच्या जॉब किंवा बिझनेस ची गोष्ट येते तुमच्या मनात भावना आहे की "मी". मीच तो आहे ज्याने इतका मोठा बिझनेस उभा केला आहे. मीच तो मॅनेजर आहे जो इतक्या लोकांना सांभाळतो. मीच तो आहे ज्याच्या हाताखाली ५० जण काम करतात. माझ्याचं मुळे ५० जणांचं घर चालतं. केवढा हा अहंकार?

ह्या ऐवजी जो व्यक्ती पूजा करतो, उपवास करतो किंवा काही उपासना कमी करतो पण जेंव्हा त्याच्या बिझनेस किंवा जॉबचा विषय येतो अगदी मनापासून प्रामाणिक जर त्याचा भाव असा असेल की, "मी फक्त माध्यम आहे. जे काही दिलं आहे ते भगवंताने दिले आहे. त्याने दिलेलं काम मी मनापासून करतो आहे." तर? इथे आपण म्हणू शकतो की ह्याला भक्तिमार्ग समजला. तुम्ही इथे ह्या व्यक्तीला अहंकार नाही हे सहज समजू शकतात.

हेच राजमौली त्यांच्या डॉक्युमेंट्री मधे सांगतात. मी कामासाठी वेडा आहे. मला कुठलीही गोष्ट ही परफेक्ट म्हणजे परफेक्टच लागती. त्यांच्या सोबत काम करणारे ऍक्टर पण हेच सांगतात. ही व्यक्ती परफेक्ट शॉट मिळण्यासाठी गरज पडली तर १०० काय २०० वेळेस त्याच आनंदानी, उत्साहाने काम करेल. हा असतो कर्म मार्ग. आता विचार करा का नाही मिळणार ऑस्कर?

आहेत पैसे कुठे तरी वापराचे आहेत एक चित्रपट बनवू आणि दुसरी बाजू ही कामाला देव मानणाऱ्या व्यक्तीची. साहजिकच पारडं जडं कर्मयोगी व्यक्तीचं रहाणार.

कुठलाही मार्ग स्वीकारा पण "मी" चं विसर्जन केल्याशिवाय तुम्ही काही जिंकू शकतं नाही. अहंकार (EGO) आधी संपवावा लागेल. मी एका पुस्तकात पण वाचलं होतं. EGO means Edging God Out. देवाला दूर ढकलणे म्हणजे EGO.

आपल्याला बोलण्यातून एखादा व्यक्ती अहंकारी आहे का नाही हे सहज लक्षात येतं. तुम्ही राजमौल ह्यांचे इंटरव्हिव बघा. कुठेही तो व्यक्ती मी असा आहे मी तसा आहे म्हणत नाही. मला स्टोरी सांगायला आवडतात आणि मी त्या आवडतील अश्या प्रकारे त्याची मांडणी करायला शिकलो आहे. इतकं साधं आणि सोप्प ते बोलतात. आणि हेच तुम्ही प्रत्येक मोठ्या व्यक्तींबद्दल अनुभवताल. काही मोठ्या लोकांचा अभ्यास करा तुम्हाला जाणवेल की हा किती साधा व्यक्ती आहे. किंवा हे पण जाणवेल की ह्या एका काळात ह्याच्या आयुष्यात अहंकार आला आणि कसा तो खाली जाऊ लागला पण पुन्हा त्याने स्वतःमधे बदल केला आणि पुहा अहंकाराला सोडून तो मोठा झाला.

प्रत्येकाने कुठला मार्ग स्वीकारावा हा त्याचा प्रश्न आहे पण "मी" चं विसर्जन होणं महत्वाचं आहे. तुम्ही पण पुस्तकं वाचून, कर्मयोगी बनून, पूजा करून किंवा तत्वज्ञान शिकून किंवा कुठल्याही अनुभवातून मी चं विसर्जन केलं असेल तर मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या रविवारी एक नवीन विषय घेऊन.

हा विषय प्रत्येकच क्षेत्रात महत्वाचा आहे म्हणून मी लिहिण्याचा प्रयत्न केला.

Layoff न्यूज

आम्ही या आठवड्यापासून एक नवीन भाग रविवारच्या आमच्या पत्रात घेऊन येतं आहोत. या भागाचं नाव आम्ही ठेवलं आहे Layoff न्यूज. मी जेंव्हा जेंव्हा न्यूज बघतो तर मला एक न्यूज जवळपास प्रत्येक आठवड्यात बघायला मिळते. ती म्हणजे Layoff, कंपनीतून इतके इतके जण काढले गेले, AI मुळे इतके जॉब्स संपले. जॉब संपले असतील पण कामं नाही संपले. ते कामं करण्याचे स्किल्स कदाचीत नसतील म्हणून व्यक्तींना काढलं जाऊ शकतं.

पण एक प्रश्न मी स्वतःला नेहिमी विचारतो काहीही वाईट दिसलं, वाचलं किंवा ऐकलं तर. तो प्रश्न म्हणजे, "मी काय मदत करू शकतो?" अरे . .रे . .इतके जॉब्स गेले. हे कोणीही म्हणेल किंवा कोणालाही वाटेल. त्या वाटण्याचं पुढे काय?

मी ठरवलं आहे की प्रत्येक आठवड्यात एक भन्नाट फ्री मधे उपलब्ध असलेली ट्रैनिंग किंवा वेबिनार मी तुमच्या सोबत शेअर करेन. कदाचित आज नाही पण कधी ना कधी तुमच्या कामाला ह्या गोष्टी येतील.

याच आठवड्यात मी परामौन्ट कंपनीने जवळ जवळ २००० लोकांना कंपनीतून काढून टाकल्याची न्यूज मी वाचली. डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही ह्या लिंक वर जाऊन सगळं वाचू शकतात.

परामौन्ट लेऑफ

आणि असे लेऑफ किंवा आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं तर आज पासूनच तयार रहा. तुम्ही हा एक वेबिनार अटेंड करू शकतात जिथे घरी बसून नीट काम केल्याने आपण कसे ऑफिस, एम्प्लॉयी न ठेवता रोज ४५ मिनिटे काम करून काही रुपये कमवू शकतो. ही आहे लिंक.

Learn to Build Business in and Around Network Marketing


Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर


Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page